SMS Alerts


SMS सुविधा
Already a member Not a member

१.सदर सुविधा अतिरिक्त व ऐच्छिक आहे. सदर अतिरिक्त सुविधेसाठी ऐच्छिकरित्या नोंदणी केलेल्या व विहित पध्दतीने शुल्क सादर केलेल्या उमेदवारालाच सुविधेचा लाभ घेता येईल.
२.सदर सुविधेसाठी इच्छुक उमेदवाराला खालीलप्रमाणे अतिरिक्त शुल्क विहित चलनाद्वारे भारतीय स्टेट बँकेमध्ये भरावे लागेल :-
(१) कायमस्वरुपी (Lifetime) सुविधा : रुपये ५५/-
(२) फक्त ठराविक परीक्षा / भरतीसाठी (Exam Specific) सुविधा : रुपये २२/-
३. सुविधेकरिता नोंदणी करण्याची पद्धत :-
(१)सदर अतिरिक्त सुविधेसाठी नोंदणी करु इच्छिणा‍र्‍या उमेदवाराला आयोगाच्या www.mpsconline.gov.in या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या वेबसाईटवर स्वत:च्या युजर आयडी व पासवर्डद्वारे प्रवेश (Login) करावा लागेल. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या वेबसाईटवर स्वत:चा युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध नसलेल्या उमेदवाराने प्रथम नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करुन युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. स्वत:च्या युजर आयडी व पासवर्डद्वारे प्रवेश केल्यानंतर Subscribe for SMS या बटनावर क्लिक करावे व कोणत्या प्रकारची SMS सुविधा (Exam Specific or Lifetime ) आवश्यक आहे, त्या सुविधेवर क्लिक करावे.
(२) सुविधेची निवड करुन झाल्यानंतर स्वत:च्या मोबाईल क्रमांकाची नोंद करावी अथवा आवश्यकता भासल्यास मोबाईल क्रमांक अद्ययावत करावा.
(३)ठराविक परीक्षा / भरतीसाठी नोंदणी करणार्‍या उमेदवारांना मोबाईल क्रमांक कोणत्याही टप्प्यावर बदलता येणार नाही. कायमस्वरुपी सुविधेसाठी नोंदणी करणार्‍या उमेदवाराला फक्त एकदाच मोबाईल क्रमांक बदलण्याची परवानगी आहे. सदर सूचनांचे पालन न करणार्‍या उमेदवाराला SMS सुविधा उपलब्ध न झाल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. अशा प्रकरणी उमेदवाराला पुन्हा नोंदणी करुन नव्याने शुल्क अदा करावे लागेल.
(४) ठराविक परीक्षा/भरतीसाठी नोंदणी करणार्‍या उमेदवारांकरिता सदर सुविधा संबंधित परीक्षा/ भरतीची अंतिम प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरु राहील. संबंधित परीक्षा/भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर SMS सुविधा आपोआप बंद होईल.
(५) प्रवेश केल्यानंतर मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्यावर अथवा अद्ययावत केल्यावर Print Challan या बटनावर क्लिक करावे व चलनाची प्रत घ्यावी. सदर चलनावर नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शुल्क चलनासह भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत बँकेच्या कार्यालयीन वेळेत रोखपालाकडे सादर करावे.
(६) भारतीय स्टेट बँकेमध्ये विहित शुल्काचा भरणा केल्यानंतर बँकेकडून चलनावर Transaction ID प्राप्त होईल. चलनावरील Transaction ID व दिनांक ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे पुन्हा नमूद (Enter) केल्याशिवाय SMS सुविधेकरिता नोंदणी पूर्ण होणार नाही. त्याकरिता आयोगाच्या www.mpsconline.gov.in या वेबसाईटवर स्वत:च्या युजर आयडी व पासवर्डद्वारे प्रवेश (Login) करावा. प्रवेश केल्यानंतर Subscribe for SMS या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर बँकेकडून प्राप्त झालेला Transaction ID व दिनांक विहित ठिकाणी विहित पध्दतीने नोंदवावा व Update या बटनावर क्लिक करावे. त्यानंतरच SMS सुविधेकरिता नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल.
(७) अचूकपणे Transaction ID व दिनांक विहित ठिकाणी विहित पध्दतीने नोंदविण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे. त्याशिवाय सुविधा उपलब्ध होणार नाही.
(८) उमेदवाराने स्वत: नोंदविलेला Transaction ID व बँकेकडून प्राप्त झालेला Transaction ID यांचा ताळमेळ ( Reconciliation ) घालून झाल्यानंतरच सुविधा कार्यरत होईल. सदर कार्यवाहीसाठी साधारणपणे तीन दिवसांचा कालावधी लागेल. सुविधा कार्यरत झाल्यानंतर उमेदवाराला SMS प्राप्त होईल.
४. ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे SMS सुविधेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवाराला खालील अतिरिक्त सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल :-
(१) नवीन जाहिरातीसंदर्भातील सूचना.
(२) बँकेकडून प्राप्त झालेला Transaction ID प्रणालीवर नोंदविल्यानंतर त्याबाबतची सूचना.
(३) परीक्षेचे वेळापत्रक
(४) निकाल
(५) मुलाखतीचा दिनांक
(६) मुलाखत रद्द झाल्यास त्याबाबतची सूचना, इत्यादी.





    Copyright © 2010 MPSC.All Rights Reserved